(गोपाळ पवार )
मुरबाड : मुरबाड या मतदार संघात मिळता़-जुळत्या उमेदवारांच्या प्रभावामुळे योग्य उमेदरांच्या मतांची टक्केवारी घट निर्माण होऊन पराभव निर्माण होण्याची शक्यता निर्माण होत असल्यानेच मुरबाड मतदार संघातील डमी उमेदवारांमुळे मुख्य उमेदवारांच्या अस्तित्वाचा प्रश्न कायमच या मतदार संघात निर्माण होत आलेला आहे. यापूर्वी सुद्धा बोगस मतदान नोंदणी करून विजय मिळवण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांनी यावेळी केला आहे. ओजिवले गावचा कातकरी समाज मोठया प्रमाणात असलयाने या गावातील २०१९ मध्ये डमी उमेदवार दिल्याने या मतदार संघात मुख्य उमदेवाराला लीड घेता आला नसल्याचा आरोपी यावेळी महाविकास आघाडीचे उमदेवार सुभाष पवार यांनी केला आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत दोन लाखांचे लिड घेणार आशी वल्गना करणारे मात्र माझ्या नावाशी मिळताजुळता उमेदवार उभा करुन मतदारांन मध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.
असा आरोप महविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांनी केला आहे. हा केवळ रडीचा डाव खेळला जात असला तरी यावेळेस काहीही फरक पडणार नाही, कारण माझ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुध्दा असाच प्रयोग केला गेला होता. परंतू मतदार सुज्ञ झाला असल्याने या त्यावेळेस संबंधित उमेदवाराला फक्त बावीस मतें मिळून आली होती असे सुभाष पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान मुरबाड विधानसभा मतदारसंघात किसान कथोरे भाजप तर राष्ट्रवादी काँग्रेस सुभाष गोटीराम पवार यांच्या सह एकुण नऊ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या बाबत बोलताना सुभाष पवार म्हणाले की माझ्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली असुन संधीसाधू राजकारण करणाऱ्या समोरच्या उमेदवाराला या वेळेस आपली जागा दिसून आल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांनी व्यक्त केला.