नवी दिल्ली – गृहमंत्री अमित शाह यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. टाटांच्या निधनामुळे समर्पित जीवनाची इतिश्री झाल्याचे शाह यांनी आपल्या शोकसंदेशात म्हंटले आहे. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, रतन टाटा यांनी देशाच्या विकासासाठी निस्वार्थपणे आपले जीवन समर्पित केले. प्रत्येक वेळी मी त्यांना भेटलो तेव्हा भारत आणि देशाच्या लोकांच्या भल्यासाठीच त्यांची बांधिलकी होती. आपल्या देशाच्या आणि लोकांच्या कल्याणाप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीमुळे लाखो स्वप्ने फुलली. पण काळ त्यांना आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, ते आपल्या मनात कायम असल्याचे शाह यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे.