अकोल्यात काँग्रेसच्या विरोधात पुन्हा पोस्टरबाजी

0

अकोला – महाविकास आघाडीतील मतदारसंघाच्या दाव्यावरून राजकारण असतांनाच अकोल्यात काँग्रेसच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली होती. दरम्यान यावर काँग्रेस कडून नाराजी व्यक्त केली जात असतानाच आता पुन्हा काँग्रेसच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टरमधून काँग्रेसला काही सवाल विचारण्यात आले आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघच्या नावाखाली ही पोस्टरबाजी करण्यात आल्याचे पोस्टरवर दिसत आहे. तर दुसरीकडे या पोस्टर वरून काँग्रेसने पोलीस आणि महापालिका प्रशासनाला लक्ष देण्याची मागणी केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच अकोल्यात लावण्यात येत असलेल्या काही निनावी पोस्टरवरून चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात येत आहे. 4 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास लावण्यात आलेल्या पोस्टर वर ‘काँग्रेस जिंकण्यासाठी लढते आहे? की हरण्याचा इतिहास निर्माण करण्यासाठी? एका अकोलेकरांचा प्रश्न..?’ असे बॅनर शहरात लावण्यात आले होते. हे बॅनर ‘एक अकोलेकर’ च्या नावाने जरी लावले असले तरी, पोस्टर लावण्यामागी उद्देशही स्पष्ट असल्याने पोस्टर वॉर वरून एकंदरीत काँग्रेस व शिवसेनेतील अकोला पश्चिम मतदारसंघातील इच्छुकांचा संघर्ष असल्याची चर्चा पाहायला मिळाली. आता ही पोस्टरबाजी संपत नाही तोच अकोल्यात पुन्हा काँग्रेसच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अकोल्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.काँग्रेस विरोधात अकोल्यात पुन्हा पोस्टरबाजी करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नावाखाली ही पोस्टरबाजी करण्यात आल्याचे दिसत आहे. शहरात ठीक ठिकाणी लावण्यात आलेल्या या पोस्टरवर काँग्रेस संविधान वाचवणार कसे ? जवाहरलाल नेहरूंनी 1951 मध्ये जातीय जनगणनेला विरोध का केला? इंदिरा गांधींनी मंडल आयोगाचा अहवाल 10 वर्ष धूळ खात का पडू दिला? राजीव गांधीनी मंडळ आयोगाचा अहवाल दुर्लक्ष का केला? काँग्रेस का हाथ भाजपा के कमल के साथ. असे म्हणत काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे. तर सर्वात शेवटी

‘राष्ट्रीय ओबीसी महासंघ’ लिहिण्यात आलं आहे. आता या पोस्टरबाजी मुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान यावर आता काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तर हे पोस्टर नेमके राष्ट्रीय ओबीसी महासंघाने लावले आहेत की काँग्रेसला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी हे ही पाहणे महत्त्वाचे आहे. तर काँग्रेस विरोधात सुरू असलेल्या पोस्टरबाजीवर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech