राजकारणात 4 जूननंतर काहीही होऊ शकतं

0

मुंबई : “राजकारणात 4 जूननंतर काहीही होऊ शकतं”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचाही भाजपसोबत जाण्याचा विचार होता, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. पुण्यातील एका उद्योजकाच्या घरी बैठक झाली होती, अशी माहिती पटेलांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याची आमची सर्वांची भूमिका आहे, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादीने लढवण्याबाबत चर्चा झाल्याचंदेखील प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे. “मी कुणाच्याबद्दल चांगलं-वाईट काहीही बोलणार नाही. पण शिवसेनेचे नाशिकचे जे खासदार आहेत त्यांच्याऐवजी दुसरं कुणाला उमेदवारी द्यावी, अशी चर्चा सुरु होती. त्या अनुषंगाने ही जागा राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ यांना द्यावी. ही जागा राष्ट्रवादीकडे यावी, अशी चर्चा झाली होती”, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

प्रफुल्ल पटेल यांनी नुकतंच एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. शरद पवार यांना भाजपसोब येण्याची 50 टक्के इच्छा होती, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले होते. त्यांच्या त्या वक्तव्यावर प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं. “आम्ही त्यावेळी चर्चा केलीच ना. आम्ही दोनवेळा शरद पवारांची भेट घेतली. चर्चा केली. त्यांना सोबत येण्याची विनंती केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech