राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी १ लाखांहून अधिक मतदान केंद्राचे नियोजन

0

मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात १ लाख ४२७ मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार केली जाणार आहेत. राज्यातील २४१ विधानसभा मतदारसंघात मुख्य आणि सहायक मतदान केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे . यावर्षी महाराष्ट्रात मुख्य मतदान केंद्र ही १ लाख १८६ असून त्यापैकी शहरी भागात ४२ हजार ६०४ तर ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ इतकी मतदान केंद्र संख्या राहणार आहे. सहायक मतदान केंद्रांची संख्या २४१ इतकी करण्यात आली आहे. गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली झाली असलयाने मतदारांची सोय आणि मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित होईल. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रात पोहोचता यावे यासाठी बऱ्याच ठिकाणी आवश्यक रॅम्पची देखील व्यवस्था झाली आहे.

मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्टीकोनातून राज्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने शहरी भागातील मतदाराची अनास्था विचारात घेऊन गृहनिर्माण संकुलात मतदान केंद्र उभारली आहेत तसेच ग्रामीण आणि आदिवासी भागातील मतदारांना मतदान केंद्राच्या जवळ लवकरात लवकर पोहोचावे यासाठी मतदान केंद्राची संख्या वाढविण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात ८ हजार ४६२ मतदान केंद्र आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर येथे ७ हजार ५७९, ठाणे – ६ हजार ९५५, नाशिक – ४ हजार ९२२ तर नागपूर येथे ४ हजार ६३१ मतदान केंद्र आहेत.

आदिवासी आणि दुर्गम क्षेत्रावर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, धुळे, आणि अमरावती जिल्ह्यात जेथे आदिवासी आणि दुर्गम भाग आहेत तेथे मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने मतदार सुविधांमध्ये सुधारणा केली आहे, जसे की मतदार सहाय्य केंद्रे, मतदार हेल्पलाईन, आणि सूचना फलक यांचा समावेश आहे. तरुण मतदार, महिला मतदारांना लक्षात ठेवून हे उपाय योजले आहे. राज्यातील विधानसभा निवडणूकांमध्ये निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील आदिवासी मतदारसंघ आणि दुर्गम भागांतील मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यावर भर दिला आहे.

राज्यातील मतदान केंद्रांची संख्या अशाप्रकारे नियोजित करण्यात आली 
पुणे – ८४६२, मुंबई उपनगर – ७५७९,मुंबई शहर – २५३८, ठाणे – ६९५५, रायगड – २८२०, पालघर – २२७८, रत्नागिरी – १७४७, सिंधुदुर्ग – ९२१, नाशिक – ४९२२, जळगाव – ३६८३, धुळे – १७५३, नंदूरबार – १४३४, अहमदनगर – ३७६५, ८. अकोला – १७४१, अमरावती – २७०८, बुलढाणा – २२८८, वाशिम – ११००, यवतमाळ – २५७८, वर्धा – १३४२, नागपूर – ४६३१, गोंदिया – १२८५, भंडारा – ११६७, गडचिरोली – ९७२, चंद्रपूर – २०७७, सोलापूर – ३७३८, सांगली – २४८२, सातारा – ३१६५, कोल्हापूर – ३४५२नांदेड – ३०८८, परभणी – १६२३, उस्मानाबाद – १५२३, हिंगोली – १०२३, औरंगाबाद – ३२७३, जालना – १७५५, , बीड – २४१६, लातूर – २१४३, अशाप्रकारे एकूण एकूण : १,००,४२७ मतदान केंद्राचे नियोजन आहे .

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech