सोलापूर – महाराष्ट्राच्या विकासासाठी व स्वाभिमानासाठी, पुढची 25 वर्षे कशी असतील याला दिशा देण्यासाठी महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारी या विषयावर पुर्ण ताकदीने महाराष्ट्रातील जनतेची सेवा करताना पवार साहेबांना साथ देण्याची उत्तम काम केल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.भाजप प्रवक्ते लक्ष्मण ढोबळे यांचा अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, माजी आमदार राजीव आवळे, महात्म्या फुले सुतगिरणीचे अध्यक्ष अभिजीत ढोबळे, शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आवळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी, पांडुरंग चौगुले, मुजमिल काझी, आण्णा शिरसट, समाधान वाघमारे, आदीसह ढोबळे समर्थक यावेळी उपस्थित होते.
खा. सुळे म्हणाल्या की, ढोबळे आणि पवार कुटुंबाचे सहा दशकाचे ऋणानुबंद होते. दोन्ही कुटुंबाने परस्परांना कधीही अंतर दिले नाही, यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जपत ढोबळे साहेबानी उत्तम काम केले. त्यामुळे पवार साहेबांचा विचार मनात घेऊन परत ते नव्या जबाबदारीने मोठ्या जोमाने काम करतील असा विश्वास व्यक्त केला.