अमोल कोल्हे ५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार

0

मुंबई – शिरुर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे ५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार आहेत. अभिनेते अमोल कोल्हे शूटिंगमध्येच व्यग्र असतात, अशी टीका त्यांच्यावर सतत केली जाते. त्यामुळे आता जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कोल्हे ५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला याबाबत ते म्हणाले की, जनेतेचे प्रश्न सोडवायचे असतील तर अभिनय क्षेत्राला वेळ देणे अवघड आहे. त्यामुळे मायबाप जनतेसाठी मी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाचे प्रश्न सोडवणे याला माझे प्राधान्य राहिल. हा ब्रेक ५ वर्षांसाठी असेल. ही कमिटमेंट आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकांचा याला अपवाद असेल. त्यांचे विचार लोकापर्यंत पोहोचवण्याला प्राधान्य असेल. हा अपवाद सोडला तर बाकी कुठेही मी पडद्यावर दिसणार नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech