मुंबई – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता भारत निवडणूक आयोग यांनी खर्चविषयक सूचना सारसंग्रह २०२४ मध्ये निर्देश दिल्यानुसार उमेदवारांनी आपल्या निवडणूक खर्चाकरिता स्वतंत्र बॅंक खाते उघडून त्यातूनच व्यवहार करणे आवश्यक आहे. उमेदवारांने निवडणूक खर्चासाठी असलेली संपूर्ण रक्कम संबंधित बँक खात्यामध्ये जमा करणे आवश्यक आहे. निवडणुकीसाठी उघडलेल्या बँक खात्यातून उमेदवाराने आपला निवडणूक खर्च धनादेश, धनाकर्ष, आरटीजीएस, एनईएफटीद्वारे करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी आपल्या विरोधात कोणतेही गुन्हे दाखल असल्याची, नसल्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. जाहिरातीचा खर्च निवडणूक खर्चाचीबाब म्हणून गणली जाईल.