येवला :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येवला साठवण तलावाची पाहणी केली. टंचाईची परिस्थिती असल्याने पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल अशा पद्धतीने नियोजन करण्यात यावे अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.
यावेळी येवला विधानसभा अध्यक्ष पसंत पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, शहराध्यक्ष दीपक लोणारी, मकरंद सोनवणे, सचिन कळमकर, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, विशाल परदेशी, विकी बीवाल, संतोष राऊळ, सचिन सोनवणे, विजय जेजुरकर, सुमित थोरात, गोटू मांजरे, पार्थ कासार, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसृष्टी प्रकल्पाची पाहणी
छत्रपती शिवाजी महाराजजांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी प्रकल्पाची निर्मिती येवला शहरांमध्ये करण्यात येत आहे आज येवला दौऱ्यावर असताना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शिवसृष्टी प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी सुरू असलेल्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.