‘मविआ’त काँग्रेस सर्वाधिक जागा लढवण्याची शक्यता

0

पवार गट आणि ‘उबाठा’ला तडजोड करावी लागणार
मुंबई – महाविकास आघाडीमध्ये (मविआ) काँग्रेस सर्वाधिक 100 ते 108 जागा लढवणार आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गट 90 ते 95 आणि शिवसेना (उबाठा) 80 ते 81 जागा लढवण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान जागा वाटपासंदर्भात मविआकडून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यापूर्वी राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे 4 प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात रहायचे. त्यामुळे प्रत्येक पक्ष सुमारे 100 हून अधिक जागा लढवायचा. परंतु, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने आता 6 पक्ष निवडणूक रिंगणार आहे. त्यात

विदर्भातील काही जागांवरून काँग्रेस आणि उबाठात टोकाचा वाद निर्माण झाला. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी बाळासाहेब थोरात यांना मविआतील समन्वयासाठी जबाबदारी दिली. बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर उद्धव ठाकरेंच्याही भेटीला पोहचले. मविआची दुपारपासून जागावाटपावर बैठक सुरू आहे. त्यात जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती पुढे आलीय. परंतु, त्यावर अजूनही अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात मविआला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे त्या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी मविआ प्रयत्नरत आहे. तर दुसरीकडे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (महायुती) लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाचे उट्टे काढण्याचा चंग बांधला आहे.परंतु, मविआतील धुसफूस स्थानिक पातळीवर कायम असल्याचे चित्र आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech