जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी नजीब मुल्ला यांना निवडून द्या – मुख्यमंत्री

0

ठाणे : ठाण्याचा मुख्यमंत्री असल्याने ठाणे जिल्ह्यात विकासाला पैसे कमी पडू दिले नाहीत. कल्याण लोकसभा क्षेत्रातील ज्यात मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ येतो, इथल्या विकास कामांसाठी पाच हजार कोटीचा निधी आणला. महायुतीचे सरकार निर्णय घेणारे सरकार आहे, यासाठी महायुतीचे सरकार हवे, याकरीता येत्या २० तारखेला महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या ठाणे जिल्ह्यातील कळवा मुंब्र्यावर दिघे साहेबांनी प्रेम केले. इथे युतीचे मतदार राहतात. नजीब हा तरुण आहे, ठाण्याचा सुपुत्र आहे, कोकणी मराठी माणूस आहे, अभ्यासू आहे, ठाणे महापालिका त्याने गाजवली आहे, आता विधानसभा गाजविण्यासाठी विधानसभेत पाठवायचे आहे. येत्या २० तारखेला महायुतीचे उमेदवार लाडका भाऊ नजीब मुल्ला यांच्या घड्याळासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

महायुतीच्या वचननाम्यानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत माता भगिनिंना १५०० वरुन २१०० रुपये देणार येणार, लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसदलात २५ हजार महिला पोलिसांची भरती केली, शेतकऱ्यांची कर्ज माफी व १५ हजार देणार, गरजवंताला अन्न, वस्त्र, रोटी, कपडा, मकान देणार, ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन १५०० वरुन २१०० करणार, जीवनावश्यक वस्तुंचे भाव पाच वर्षे स्थिर ठेवणार, २५ लाख रोजगार निर्मिती, १० लाख बेरोजगार तरुणांना १० हजार प्रशिक्षण भत्ता देणार, २५ हजार गावात पाणंद रस्ते करणार, आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांना महिना १५ हजार मानधन, शेतकऱ्यांच्या वीज बिलात ३० टक्के सवलत, सरकार स्थापनेनंतरच्या १०० दिवसात व्हिजन महाराष्ट्र २०२८ जाहीर करणार, टोरन्ट बंद करणार, हे महायुतीचे सरकार निर्णय घेणारे सरकार आहे ठाणे जिल्हा हा महायुतीचा आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेबांचा बालेकिल्ला आहे.

निवडणूका विकास कामांवर व्हायला हव्यात खासदार नरेश म्हस्के, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या एका शब्दावर ३५०० कोटी महापालिकेचा निधी विकास कामांसाठी दिला. सहा महिन्यांत कळवा मुंब्र्याच्या विकास कामांसाठी २०० कोटीचा निधी खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. पण कामाचे श्रेय घ्यायला जितेंद्र आव्हाड पुढे असतात. दुटप्पी भूमिका घेणे हा त्यांचा स्वभाव आहे. निवडून आल्यावर टोरन्ट महिन्याभरात रद्द करु म्हणणारे याच जितेंद्र आव्हाड यांनी टोरन्टची फ्रॅन्चायझी आणण्यात पुढाकार घेतला होता. यामुळे मी वचन देतो की, निवडून आल्यावर कळवा मुंब्र्यातील नागरिकांना टोरन्ट पासून मोकळे करणार, शाळा देणार, विकास कामांचे भूखंड विकसित करून देणार, कळवा पूर्व भागात शाळा, स्मशानभूमी, पिण्यायोग्य पाणी, ३०० किलोमीटर रोड बांधून देणार यासाठी येत्या २० तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन १४९- मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech