केलेल्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण

0

मुंबई – नाशिकच्या जागेवरून भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गट या तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच प्रीतम मुंडे यांना मी नाशिकमधून उभी करेन, असं विधान पंकजा मुंडे यांनी केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चाही रंगू लागल्या होत्या. यावरून अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनीही पंकजा मुंडेंनी आधी बीडमध्ये लक्ष द्यावं, असा सल्ला दिला होता. दरम्यान, या विधानाबाबत आता पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते विधान मी गंमतीने केलं होते. असे त्या म्हणाल्या. बीडमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

मी प्रीतम मुंडेंसाठी उमेदवारी मागितली असं काहीही नाही. गैरसमज करून घेणाऱ्या लोकांच्या नासमझपणाचे हे लक्षण आहे. हा विषय मी सहज बोलले होते. प्रीतम मुंडे या १० वर्ष खासदार असताना आता त्यांच्याऐवजी मला उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळेच प्रीतमताईंचे सासर नाशिककडे आहे, त्यांना तिकडे पाठवून देऊ, असे मी गंमतीने बोलले होते. हा विषय इतका वाढवण्याची आवश्यकता नव्हती, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिले.

पुढे बोलताना त्यांनी बीडमधून विजयी होण्याचा विश्वासही व्यक्त केला. मी मागील काही दिवसांपासून बीडमध्ये सभा आणि बैठका घेत आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, या प्रतिसादाचे रुपांतर मतांमध्ये किती होईल, हे निकालाच्या दिवशी समजेल. मात्र, मला माझ्या विजयाचा विश्वास आहे, असे त्या म्हणाल्या.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech