रणधुमाळी आटोपताच फडणवीसांनी घेतली सरसंघचालकांची भेट

0

नागपूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, बुधवारी संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस आणि सरसंघचालक यांच्यात सुमारे 20 मिनीटे चर्चा झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे आहेत. राजकीय व सामाजिक दृष्टीकोनातून कुठलाही मोठा निर्णय घेण्यापूर्वी फडणवीस नेहमीच संघाचे मत आणि मार्गदर्शन घेत असतात. राज्यातील प्रत्येक मोठ्या घाडामोडीपूर्वी फडणवीस संघ मुख्यालयात जातात. दरम्यान भेटीचे प्रयोजन आणि चर्चेचा माहिती अद्याप पुढे आली नाही.

सरसंघचालक केवळ मतदानासाठी मंगळवारी रात्री नागपूरला आले होते. त्यानंतर संध्याकाळी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर सरसंघचालक पुढील प्रवासासाठी निघून गेलेत. त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी आणि त्यात काय चर्चा झाली यासंदर्भातील माहिती पुढे आलेली नाही. संघाच्या मार्गदर्शनानुसार फडणवीस आपले निर्णय घेतात. यापूर्वी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर फडणवीसांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. परंतु, सहसरकार्यवाह अतुल लिमयेंच्या सूचनेनंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय फिरवला. त्याचप्रमाणे फडणवीसांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात संघाच्या स्वयंसेवकांनी जोरदार प्रयत्न करून भाजपला साथ दिली. यासर्व गोष्टी लक्षात घेता आजच्या भेटीत काहीतरी महत्त्वाची चर्चा झाल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech