ठाण्यात तीन दिवसात 746 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांकडून गृहमतदान

0

ठाणे : गेल्या तीन दिवसांत 18 विधानसभा मतदारसंघातील 12 या मतदारसंघात 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग नागरिकांचे गृहमतदान पार पडले. या गृहमतदानात एकूण 746 नागरिकांनी गृहमतदानाच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार बजावला. दि.9 नोव्हेंबरपासून गृहमतदानास सुरूवात झाली असून दि.17 नोव्हेंबर 2024 पर्यंत गृहमतदान सुरू राहणार आहे. दि.9 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर या तीन दिवसात 134 भिवंडी ग्रामीण, 135 शहापूर अ.ज, 138 कल्याण पश्चिम, 139 मुरबाड, 140 अंबरनाथ, 141 उल्हासनगर, 142 कल्याण पूर्व, 143 डोंबिवली, 146 ओवळा माजिवडा, 147 कोपरी पाचपाखाडी, 148 ठाणे तर 149 कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात गृहमतदान पार पडले. ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात गृहमतदानास दि.9 नोव्हेंबर 2024 पासून सुरुवात झाली आहे. या गृहमतदानास 85 वरील ज्येष्ठ मतदारांचा व दिव्यांग मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जे मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही अशांसाठी मा.भारत निवडणूक आयोगाने गृहमतदानाची सोय केल्याबद्दल अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.

134 भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक – 78, दिव्यांग मतदार – 02, 135 शहापूर अ.ज. विधानसभा मतदारसंघ – 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक – 55, दिव्यांग मतदार – 08, 138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ – 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक – 43, दिव्यांग मतदार – 02, 139 मुरबाड विधानसभा मतदारसंघ – 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक – 58, दिव्यांग मतदार – 02, 140 अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ – 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक – 56, दिव्यांग मतदार – 22, 141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ – 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक – 24, दिव्यांग मतदार – 07, 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ – 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक – 59, दिव्यांग मतदार – 12, 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघ – 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक – 78, दिव्यांग मतदार – 02, 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ – 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक – 43, दिव्यांग मतदार – 18, 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ – 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक – 36, दिव्यांग मतदार – 05, 148 ठाणे विधानसभा मतदारसंघ – 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक- 111, दिव्यांग मतदार – 04, 149 कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ – 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक – 10, दिव्यांग मतदार – 11

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech