आम्ही राज्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली : अजित पवार

0

भाजपकडून आम्हाला राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र आम्ही ही ऑफर स्वीकारली नाही. कारण राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे यापूर्वी विविध मंत्रीमंडळांमध्ये कॅबिनेट मंत्रीपदावर राहिले आहेत. त्यामुळे आम्ही कॅबिनेट मंत्रीपदसाठी आग्रही आहोत. त्यामुळेच आम्ही राज्यमंत्रीपद स्वीकारलं नाही, असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज (दि.९) माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

आमची राज्यसभेची एक जागा आहे. लोकसभेची एक जागा आहे. तसेच राज्यसभेत आगामी निवडणुकीत आमच्या दोन जागा वाढत आहेत. संसदेत आमच्या एकूण चार जागा होणार आहेत. त्यामुळे आम्हाला स्वतंत्र मंत्रालय असणारे राज्यमंत्रीपद दिले जाईल, अशी ग्वाही देण्यात आली होती मात्र आम्ही प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट मंत्रीपदासाठी आग्रही राहलो. भाजपनेही आमच्या विनंतीवर विचार होईल असे सांगितले आहेत.

आमचा पाठिंबा भाजप प्रणित एनडीएलाच रहिल, असेही अजित पवार यांनी या वेळी सांगितले.प्रफुल पटेल हे ज्येष्ठ नेते आहेत, यापूर्वी ते कॅबिनेट मंत्रीपदावर राहिले आहेत. त्यामुळे कॅबिनेट मंत्रीपदच हवे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची भूमिका होती. म्हणून मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा प्रफुल पटेल यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात येईल,’ अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या कॅबिनेटमध्ये कोण कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी लागणार, हे जवळपास निश्चित मानले जात होते. तशी तयारी देखील त्यांच्या जवळच्या सहकार्‍यांकडून करण्यात आली होती.

मात्र अजित पवार गटाची लोकसभेवर केवळ एक जागा निवडून आली. त्यामुळे अजित पवार गटाला जर कॅबिनेट मंत्रीपद दिले तर एनडीएतील इतर घटक पक्ष नाराज होण्याची शक्यता होती. सोबतच राज्यात ७ खासदार असलेल्या शिवसेना शिंदे गटालाही राज्यमंत्रीपद मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शिवसेना शिंदे गटासह इतर घटकपक्षांची नाराजी ओढवेल, या शक्यतेचा विचार करून भाजपने सावध भूमिका घेतली आणि अजित पवार गटाला राज्यमंत्रीपद स्वतंत्र प्रभार देऊ केले.

मात्र अजित पवार गटाने ते नाकारले.तत्पूर्वी आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. दीर्घकाळ त्यांच्या निवासस्थानी बैठक चालली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, समीर भुजबळ उपस्थित होते.

भाजपकडून आम्हाला राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र आम्ही ही ऑफर स्वीकारली नाही. कारण राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे यापूर्वी विविध मंत्रीमंडळांमध्ये कॅबिनेट मंत्रीपदावर राहिले आहेत.

त्यामुळे आम्ही कॅबिनेट मंत्रीपदसाठी आग्रही आहोत. त्यामुळेच आम्ही राज्यमंत्रीपद स्वीकारलं नाही, असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज (दि.९) माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.आमची राज्यसभेची एक जागा आहे. लोकसभेची एक जागा आहे. तसेच राज्यसभेत आगामी निवडणुकीत आमच्या दोन जागा वाढत आहेत.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech