पुणे – मी आजवर दहा निवडणुका लढलो. त्या निवडणुकामध्ये काही वेळा विजय, तर काही वेळा पराभव पाहण्यास मिळाला. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत काही तरी शिकायला मिळाले. तसं याही निवडणुकीत खूप काही शिकलो. पण या निवडणुकीत माझ्या कुटुंबावर टीका करण्यात आली. त्यामुळे मला प्रचंड त्रास झाला आणि त्रास सहन देखील केला. यामुळे माझं कुटुंब उध्वस्त होण्याची वेळ आली होती. पण मी याचं उत्तर येत्या काळात निश्चित देईल. तसेच या सर्व प्रकारामुळे माझ वैयक्तिक आणि आर्थिक मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. माझे कितीही नुकसान होऊ द्या, मी काही घाबरत नाही. मी काहीच घेऊन आलो नव्हतो आणि काही घेऊन जाणार नाही. मी काही पवारसाहेबाच्या किंवा विखे पाटलांच्या घरी जन्माला आलो नाही. त्यामुळे येत्या काळात त्यांना नक्कीच उत्तर दिल जाईल असे सांगत भाजप नेत्यांना त्यांनी सुनावले. पुण्यातील शरद पवार गटाचे अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे यांनी दरवर्षीप्रमाणे निवडणुकीपूर्वी आणि नंतर उमेदवारांच्या वाडेश्वर कट्ट्याचे आयोजन केले होते. यावेळी रविंद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांनी उपस्थित होते.
रविंद्र धंगेकर म्हणाले की, मी आजवर दहा निवडणुका लढलो. त्या निवडणुकामध्ये काही वेळा विजय, तर काही वेळा पराभव पाहण्यास मिळाला. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत काही तरी शिकायला मिळाले. तसं याही निवडणुकीत खूप काही शिकलो. पण या निवडणुकीत माझ्या कुटुंबावर टीका करण्यात आली. त्यामुळे मला प्रचंड त्रास झाला आणि त्रास सहन देखील केला. यामुळे माझं कुटुंब उध्वस्त होण्याची वेळ आली होती. पण मी याचं उत्तर येत्या काळात निश्चित देईल. तसेच या सर्व प्रकारामुळे माझ वैयक्तिक आणि आर्थिक मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. माझे कितीही नुकसान होऊ द्या, मी काही घाबरत नाही. मी काहीच घेऊन आलो नव्हतो आणि काही घेऊन जाणार नाही. मी काही पवारसाहेबाच्या किंवा विखे पाटलांच्या घरी जन्माला आलो नाही. त्यामुळे येत्या काळात त्यांना नक्कीच उत्तर दिल जाईल असे सांगत भाजप नेत्यांना त्यांनी सुनावले.