मी मरेपर्यंत राजकीय संन्यास घेणार नाही

0

जळगाव – मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही, अशी मोठी घोषणा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एका मुलाखतीत केली आहे. आता माझा निवडणूक लढवण्याकडे कल नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. विधान परिषदेचा सदस्य असल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक लढवणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे विधानसभेची निवडणूक न लढवण्याचा मी निर्णय घेतला असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. खासदारकी माझ्या परिवारात आहे. त्यामुळे मी लोकसभाही लढवणार नाही. मात्र, मी मरेपर्यंत राजकीय संन्यास घेणार नसल्याचेही एकनाथ खडसे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे. ते आज जळगाव येथे बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत बोलताना थेट शरद पवार यांना भाजपमध्ये शमील होण्याचे आवाहन केले होते. यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधान का केलं असावं त्याचे अर्थ वेगवेगळे लागू शकतात. पण नरेंद्र मोदी यांना कोणाच्या मदतीची आवश्यकता भासणार नाही एवढं चांगलं बहुमत त्यांना मिळेल. राजकारणात लहान पक्ष मोठ्या पक्षात विलीन होणे, मोठे पक्ष बरखास्त होणे, अशी प्रक्रिया बऱ्याचदा यापूर्वीही घडली आहे. निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेचा हा एक भाग असतो. त्या माध्यमातून शरद पवारांनी हे वक्तव्य केलं असावं, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech