नाशिक : राज्याचे माजी अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की जरांगे पाटील यांच्यामुळे माझ्या मताधिक्य कमी झाले त्यामुळे कोणीही काहीतरी कारण सांगावे म्हणून ईव्हिएम वरती खापर फोडणे हे चुकीचे आहे. उगाच पराभव पचवता येत नसेल तर वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे असा सल्लाही त्यांनी विरोधकांना देताना भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत त्यांनी जोरदार बॅटिंग करताना सांगितले की ज्यांचे संख्या व जास्त त्यांचा मुख्यमंत्री असतो हे गणितच आहे त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. तसेच महाविकास आघाडीकडून ईव्हीएम मशीन बाबत केल्या जात असलेल्या आरोपांवर बोलतांना भुजबळ म्हणाले की, मला ५६ ते ५७ हजाराचे लीड होते. माझे मतदान १ लाखावर जायला हवे होते. जरांगेंमुळे एका मोठ्या वर्गाचे मतदान मिळाले नाही. ईव्हीएममध्ये गडबड असती तर माझे मताधिक्य वाढले असते ते कमी का झाले? लोकसभेला ईव्हीएम बरोबर होते, काहीतरी कारणे शोधावी लागतात, कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडावे लागते, असे म्हणत छगन भुजबळ यांनी विरोधकांना टोला लगावला.
यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, “१३२ आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखे काही नाही. एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा सगळ्यांना वाटत होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेबाहेर राहून काम करेन असं सांगितलं होतं. पण त्यांना दिल्लीतून आदेश आला की तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा आदेश मानला. महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केलं. त्यामुळे बाकीचे प्रश्न निर्माण होत नाही. मागासवर्गीय आणि ओबीसी यांच्या अधिकारांवर गदा येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केलं. शक्ती मागे उभी केली आहे. त्यामुळे त्यांना काही लोक टार्गेट करत आहेत. याचं कारण तेच आहे”, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.