ठाणे : मागील काही दिवसापासून ठाणे शहर विधानसभेचे भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या मार्फत प्रचार रॅली आणि मॉर्निग वॉक आदींवर अधिक भर दिला जात असल्याचे दिसत आहे. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी केळकर यांनी बारा बंगला परिसरात मॉर्निग वॉक करणाºया नागरीकांनी संवाद साधला. तसेच महायुतीच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. तर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्यांनी देखील केळकर यांना शुभेच्छा दिल्या.
संजय केळकर यांच्या प्रचाराचा झंझावात सध्या सकाळी ७ वाजताच सुरु होत आहे. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे ते सध्या प्रचार रॅलीवर भर देत असल्याचे दिसत आहे. त्यात मागील तीन दिवसापासून ते मॉर्निग वॉक करणाºयांशी संवाद साधत आहेत. गुरुवारी सकाळी त्यांनी बारा बंगला परिसरात मॉर्निग वॉक करणाऱ्या जेष्ठ नागरीक, महिला, तरुण वर्ग यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेवक भरत चव्हाण, सुभाष काळे, राजेश गाडे, कृष्णा भुजबळ, गणेश भोईर, सुचित्रा भोईर, संतोष डाळुंखे, रमेश सांगळे, प्रमोद चव्हाण आदींनी देखील सहभाग घेतला होता. यावेळी केळकर यांचा जेष्ठ नागरीकांबरोबर चांगला संवाद झाला. तसेच तरुण वर्गाने देखील महायुती करीत असलेल्या कामांचे कौतुक केले. सलग तिसºया दिवशी मॉर्निग वॉक रॅलीला केळकर यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.