महायुती घटक पक्ष युवा स्वाभिमानच्या रवी राणांना अधिकृतपणे पाठिंबा जाहीर

0

अमरावती – अमरावती भाजपच्या कोट्यातून महायुतीचे घटक पक्ष युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांना बडनेरा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सायंकाळी जाहीर केले की, रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष महायुतीचा घटक पक्ष असून महायुतीने बडनेरा विधानसभा मतदारसंघ रवी राणा यांच्या करिता भाजपच्या कोट्यातून सोडला आहे. याप्रकारे बडनेरा विधानसभा मतदारसंघात युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. तथापि आता अति हुशारचा पोपटच झाला आहे.

भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघात पक्षातून बंडखोरी केल्यास पक्षातून थेट हकालपट्टीची तंबी देखील दिली आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले, पिरिपा कवाडे आणि लहूजी शक्ती सेना महायुतीचे युवा स्वाभिमान पक्षाचे अधिकृत उमेदवार रवी राणा हे पाणा निवडणूक चिन्हावर पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी सर्व मातृ शक्ती- पितृ शक्तीच्या आशीर्वादाने 29 आक्टोबर 2024 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्या आधी सोमवारी 28 आक्टोबर रोजी महायुतीने रवी राणा यांना अधिकृतपणे महायुतीचे उमेदवार जाहीर करुन सक्रिय पाठिंबा दिल्याने बडनेरा विधानसभा मतदारसंघात उत्साहाचे वातावरण आहे. मंगळवारी 29 आक्टोबर रोजी रवी राणा यांच्या नामांकन रॅलीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले, पिरिपा कवाडे आणि लहूजी शक्ती सेना महायुतीचे युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीने केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech