खासदार डॉ.अनिल बोंडे ठरले अमरातीचे ‘किंगमेकर’

0

अमरावती : भारतीय जनता पार्टीने लोकसभा व विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद देऊन त्यांच्या खांद्यावर जिल्ह्याची तर माजी मंत्री, माजी आमदार प्रवीण पोटे यांना शहराध्यक्ष पदाची धूरा देऊन त्यांच्या महापालिका क्षेत्राची जबाबदारी दिली होती. डॉ. बोंडे यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. जिल्ह्यात ओबीसी समुदायाचे प्राबल्य चांगले आहे, ते लक्षात घेऊन प्रमोद कोरडे यांना एकीकडे महामंडळाचे अध्यक्षपद दिले तर दुसरीकडे मोर्शी मतदारसंघात उमेश यावलकर यांना उमेदवारी दिली. त्याची परतफेड ओबीसी समुदायाने भाजपला विजयाच्या स्वरूपात करून दिली. डॉ. बोंडे यांची भूमिका त्यात महत्त्वाची ठरली.

दुसरीकडे त्यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्या सहमतीने केवलराम काळे आणि प्रवीण तायडे यांची उमेदवारी पक्षाकडून निश्चित करून घेतली. एकूणच या निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदारसंघापैकी पाच मतदारसंघात भाजपला विजय मिळाला. प्रवीण पोटे यांनी महापालिका क्षेत्रात सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नासाठी कसोशीने प्रयत्न केले. एवढेच नव्हे तर ग्रामीण भागात प्रभाव असलेल्या ठिकाणी जाऊन महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार केला. तसेच महायुतीचे दोन उमेदवार सुलभाताई खोडके आणि रवी राणा हे निवडून आलेत. जिल्ह्यावर भाजपचा भगवा फडकला. त्याचे शिल्पकार डॉ. अनिल बोंडे हे ठरले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech