नवी दिल्ली : लोकसभेत आज मांडण्यात आलेल्या रेल्वे संशोधन विधेयक-2024 वर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी आपले मत मांडले व सूचना केल्या
1) जोगेश्वरीला जंकशन बनवण्यात आले. याला हॉंगकॉंगच्या धर्तीवर मल्टि मॉडेल कनेक्टिव्हिटीची जोड दयावी. येथे कारपार्किंग, हॉटेल, मॉल इत्यादी सुविधा देण्यात याव्यात.
2) मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे नेहमीच गर्दीने भरलेल्या असतात. ही गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे काय उपाय योजना करत आहे.
3) कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनिकरण करण्यात यावे अशी कोकणातील जनतेची मागणी आहे. रेल्वे प्रशासन याबाबत काय विचार करत आहे. ही मागणी कधी पूर्ण होणार.
4) कोकण रेल्वेवर डबल ट्रॅक करण्यासाठी अर्थसंकल्पिय अधिवेशनात बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याचे काय झाले. ही बैठक कधी घेण्यात येणार आहे.
या सर्वांचे उत्तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी द्यावे अशी विनंती खासदार रविंद्र वायकर यांनी आज लोकसभेत केली.