उमर अब्दुल्ला व मेहबुबा मुफ्ती पराभूत

0

श्रीनगर – लोकसभा निवडणुकीत जम्मू-काश्मीरमध्ये माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना त्यांच्या जागेवरून निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. उमर अब्दुल्ला बारामुल्लामध्ये उमर तर अनंतनागमध्ये मेहबुबा मुफ्ती निवडणुकीत पराभूत झाले आहेत. ओमर अब्दुल्ला यांचा पराभव करणाऱ्या अभियंत्याचे नाव राशिद शेख आहे. शेख यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि सध्या ते टेरर फंडिंग प्रकरणात तिहार तुरुंगात आहेत.

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, जम्मू आणि काश्मीर राज्याचे 2 माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना त्यांच्या संबंधित लोकसभा जागांवर दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. अब्दुल्ला बारामुल्लामध्ये सुमारे 2 लाख मतांनी आणि मेहबुबा मुफ्ती अनंतनाग-राजौरी मतदारसंघात 2.5 लाख मतांनी पराभूत झाल्या आहेत. बारामुल्ला लोकसभा जागेवर तिसऱ्या क्रमांकावर हाय प्रोफाइल नेते साजिद लोन आहेत, ते जम्मू काश्मीर पीपल कॉन्फरन्स पार्टीचे उमेदवार आहेत. उमर यांनी आपला पराभव मान्य केला आहे.निवडणुकीत मेहबुबा मुफ्ती यांचा पराभव करणारे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मियां अल्ताफ अहमद आहेत. अहमद आणि मुफ्ती यांच्या मतांचा फरक सुमारे अडीच लाख आहे.

अब्दुल रशीद उर्फ इंजिनियर रशीद सध्या टेरर फंडिंग प्रकरणी तिहार तुरुंगात बंद आहे. दोन वेळा आमदार राहिलेले आणि अवामी इत्तेहाद पक्षाचे प्रमुख रशीद हे बारामुल्लामधून निवडणूक लढवणाऱ्या 22 उमेदवारांपैकी एक आहेत. रशीदला एनआयएने 2019 मध्ये टेरर फंडिंग प्रकरणात अटक केली होती. त्यांची 2 मुले अबरार रशीद आणि असरार रशीद यांनी त्यांच्या वतीने प्रचार केला होता. रशीद यांनी 2008 आणि 2014 मध्ये लंगेट विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech