मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही – अजित पवार

0

पुणे – विधानसभा जागावाटपाची चर्चा महायुतीमध्ये सुरू आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ८०-९० जागा मिळू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. या चर्चांबद्दल अजित पवारांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना उत्तर दिले. त्याचबरोबर मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही, असे भाष्य अजित पवारांनी यावेळी केले. पुण्यातील मानाच्या दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आली. पूजा पार पडल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानसभा जागावाटप, मुख्यमंत्रिपद या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.

अजित पवार म्हणाले, “महायुतीचे सरकार आणणे, हे आमचे टार्गेट आहे. त्याकरिता महायुतीतील सगळेच घटक प्रयत्नशील आहेत. त्या पद्धतीने आम्ही पुढे चाललो आहोत. जागावाटपाचे बरेच काम झाले आहे. काही थोडेफार आहे, मार्ग नाही निघाला; तर पुन्हा बसू आणि मार्ग काढू”, अशी अजित पवारांनी यावेळी दिली. महायुतीत ८० ते ९० जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, “ज्यावेळी मित्रपक्षांसहित सगळ्यांचे जागावाटप होईल, तेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत आणि जाहीर करू. त्यावेळी तु्म्हाला समजेल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech