भगवान भक्तीगडावर पहिल्यांदाच पंकजा-धनंजय मुंडे एकत्र

0

मुंबई : राज्यात विधानसभेची निवडणूक जवळ येत असल्याने अनेक राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. यामुळे दसरा मेळाव्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बीडमध्ये संत भगवान बाबा यांच्या जन्मभूमीवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटातील मंत्री धनंजय मुंडे पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. धनंजय मुंडे यांनी ‘चलो भगवान भक्तीगड…! आपला दसरा, आपली परंपरा…’अशा शब्दांत भावना व्यक्त करत आपल्या उपस्थितीची माहिती दिली आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांपासून हा मेळावा आयोजित केला जातो, त्यात राज्यभरातून समर्थक उपस्थित राहतात. या दसरा मेळाव्यात दोन्ही भावंडे काय बोलतील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही बीडमध्ये उत्सुकता वाढली आहे. मनोज जरांगे पाटील यांनीही नारायणगडावर दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात दोन महत्त्वाचे दसरा मेळावे होणार आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech