मुंबई : आम्ही निष्ठेने काम केले म्हणून आज लोक आमच्याबरोबर आहेत परंतु तुम्ही लोकांच्या पाठीत खंजीरस खूपसाला म्हणून तुम्हाला सोडून निघून जात आहे आणि आज तुम्ही आम्हाला गद्दार म्हणतात मग तुम्ही काय केलं असा प्रश्न मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी केला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी पदाधिकाऱ्यांचा तसेच महायुतीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक असे विविध कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी नाशिक मध्ये आले होते.
नाशिक मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाल्यानंतर खासदार हेमंत गोडसे व इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही जर शिवसेना सोडली नसती तर आम्हाला अटक झाली असती किंवा आमच्यावरती दुसरी कारवाई झाली असती म्हणूनच आम्ही तुमच्या गमिनी काव्याची माहिती लागल्यानंतर तुमच्याशी बोलत बोलत पन्नास आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडलो असे सांगून ते म्हणाले की आपण किती पातळ यंत्र आहात हे आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती पडला आहे कारण तुम्ही कोणाचेच होत नाही आणि कोणाला उभेही करत नाही तुमचा बोलविता धनी फक्त खोके आणि कंटेनर आहेत असा टोला देऊन शिंदे म्हणाले की जरा आपलं वागणं बोलणं काय आहे याचा आत्मपरीक्षण करा. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आपण लग्न एकाशी केलं आणि संसार दुसऱ्याशी केला ही कोणती नीती झाली निवडणूक लढताना भाजपा बरोबर लढल्या पण आपल्या मनातील मुख्यमंत्री होण्याची इच्छा जागृत झाली आणि माझं नाव असताना देखील मला बाजूला करून आपण मुख्यमंत्री झालात ही कुठली परिस्थिती असा प्रश्न विचारला.
शिंदे म्हणाले की, आज बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आम्ही चालवत आहोत याचा आम्हाला आनंद आहे आणि यामध्ये आम्ही समाधानी देखील आहोत पण आपण काय केले असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारून शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना ही तुम्ही ज्या बाळासाहेबांचा काँग्रेसला विरोध होता त्यांच्याकडे गहाण टाकली त्यांच्या विचारसरणीने तुम्ही वागू लागले एवढेच नव्हे तर सर्वसामान्य शिवसैनिकांवरती तडीपरी मोक्का यासह वेगवेगळ्या प्रकारे कारवाई होत गेली शिवसेना आमदारांवरती अनेक गंभीर स्वरूपाच्या कारवाया प्रशासनाने केला पण आपण मुख्यमंत्री म्हणून काय केले संघटना पक्ष म्हणून काय केलं असा प्रश्न विचारून शिंदे म्हणाले की या प्रश्नाचे उत्तर आपण सर्वप्रथम द्या आणि नंतर आम्हाला गद्दार म्हणा खरे गद्दार तर आपण आहात नुसते गद्दार नाही तर महा गद्दार आहात असा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केला.