प्रेमसिंग तमांग दुसऱ्यांदा सिक्कीमचे मुख्यमंत्री, राज्यपालांनी घेतली शपथ

0

समारंभात 11 कॅबिनेट सदस्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथही घेतली.

गंगटोक :  सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) पक्षाचे अध्यक्ष प्रेमसिंग तमांग यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजधानी गंगटोक येथील पालजोर स्टेडियमवर सोमवारी झालेल्या भव्य शपथविधी समारंभात तमांग यांनी 11 मंत्रिमंडळ सदस्यांसह पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी प्रेमसिंग तमांग यांना मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यानंतर राज्यपालांनी मंत्रीपरिषदेच्या सदस्य सोनम लामा, अरुण उप्रेती, समदुप लेपचा, भीम हाँग लिंबू, भोजराज राय, जीटी ढुंगेल, पुरण गुरुंग, पिंचो नामग्याल लेपचा, एनबी दहल, राजू बस्नेत आणि छिरिंग टी भोट्या यांना शपथ दिली.

एसकेएम सरकारमधील पाच माजी मंत्र्यांना दुसऱ्या टर्ममध्ये स्थान मिळाले नाही. यामध्ये बीएस पंत, लोकनाथ शर्मा, संजीत खरेल, एलबी दास आणि एमएन शेर्पा यांचा समावेश आहे. माजी मंत्री केएन लेपचा यांचा निवडणुकीत पराभव झाला होता.

यावेळी सिक्कीम आणि राज्याबाहेरील मान्यवर उपस्थित होते. तसेच राज्यातील सहाही जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गंगटोक महापालिका क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या.

त्याचबरोबर सरकारी कार्यालयेही दुपारी १२ वाजल्यापासून बंद ठेवण्यात आली होती. राज्य विधानसभा निवडणुकीत 2024 मध्ये SKM पक्षाने 32 पैकी 31 जागा जिंकून दुसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे. 2019 च्या निवडणुकीत, SKM ने 25 वर्ष जुन्या सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) पक्षाच्या सरकारला केवळ 17 जागा जिंकून काढण्यात यश मिळवले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech