पुनर्वसन योग्य पद्धतीनं केलं जाईल

0

मुंबई – मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री, आमदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत युतीधर्मावर सेनेच्या मंत्र्यांनी त्यांच्या असलेल्या नाराजीला वाचा फोडली. नाशिक, ठाणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग, संभाजीनगर हे मतदारसंघ सोडू नये यासाठी ठाम भूमिका घ्यावी अशी मागणी या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती आहे. तडजोडी कराव्या लागतात, पण खासदारांवर अन्याय होणार नाही असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आमदारांना आणि नेत्यांना विश्वास दिल्याचं समजतंय.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेतली. लोकसभा निवडणूकीच्या संदर्भात कोणते मतदारसंघ आपल्याकडे असावेत यावर चर्चा केली. इतर पक्ष आपल्या जागेवर दावा करतात त्यावर आमदारांनी आग्रही भूमिका मांडली. ही निवडणूक लढवताना इतर पक्षातील नेत्यांशी कसे संबध असावेत यावर चर्चा झाली. काही अडचणी येत असतील तर एक वेगळी विंग तयार केली आहे. तीनही पक्षाचे प्रतिनिधी एकमेकांशी संपर्क साधत राहतील. ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची आहे, जी जिंकायची आहे असा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech