रोहित पवारांनी राम शिंदेंचे कार्यकर्ते पैसे वाटताना VIDEO दाखवला

0

अहमदनगर : अहिल्यानगर – कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार राम शिंदे यांचे नातेवाईक असणारे खांडेकर नावाच्या व्यक्तीकडे सहा ते सात लाख रुपयांची रोकड सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी कर्जतमधील लकी हॉटेल या ठिकाणी पकडले आहे. यानंतर पोलिसांना बोलून त्याला ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्याकडून पैसे दिलेल्या आणि देत असलेल्या नागरिकांची यादी याच प्रमाणे रोकड आमदार राम शिंदे यांचा फोटो या ठिकाणी मिळून आला आहे.

रोहित पवार यांनी त्यांच्या एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) व्हिडीओ शेअर केले आहेत. व्हिडीओ शेअर करताना रोहित पवार म्हणाले, भाजप उमेदवार राम शिंदे यांच्यासाठी कर्जतच्या लकी हॉटेलमधून पैसे वाटप केले जात असल्याची माहिती आमच्याकडून दुपारी 2 वाजता प्रशासनाला देऊनही प्रशासनाने त्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. तब्बल दोन तासांनी 4 वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्याठिकाणी पोलिस बंदोबस्तात पैसे वाटप करताना आमच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला रंगेहात पकडलं. याबाबत प्रशासन काय कारवाई करतं याकडं आमचं बारकाईने लक्ष आहे.

राज्यातील हायव्होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात यंदाही चुरशीची लढत होत आहे, विद्यमान आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्यात थेट लढत होत आहे. मंगळवारी बारामती अॅग्रोच्या अधिकाऱ्याकडे रोकड सापडल्यानंतर तर वातावरण अधिकच तापले. आज रोहित पवारांनी करारा जवाब दिला आहे. आज रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसेवाटप केल्याचा आरोप करत व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे, येथील मतदारासंघात वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech