केळकर यांच्या बाईक रॅलीला दमदार प्रतिसाद 1500 हुन अधिक जणांचा समावेश

0

ठाणे : विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार संजय केळकर यांच्या शनिवारी निघालेल्या रॅलीला हजारोंच्या प्रतिसाद मिळाला असताना रविवारी सुद्धा हिरानंदानी इस्टेट भागातून निघालेल्या बाईक रॅलीला दमदार प्रीतिसाद मिळाला. या बाईक रॅलीत 1500 हुन अधिक बाईकस्वार सहभागी झाले होते. केळकर यांनी देखील बाईकवर बसून आपला प्रचार केला. प्रचार आता अंतिम टप्यात आला असून केळकर यांनी यात आघाडी घेतली असल्याचे दिसत आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवसा आधी म्हणजेच रविवारी सकाळी केळकर यांच्या प्रचारासाठी बाईक रॅली काढण्यात आली होती. या बाईक रॅलीत आमदार निरंजन डावखरे, भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, शिवसेना शहर अध्यक्ष हेमंत पवार व महायुतीचे हजारो कार्यकार्ते उपस्थित होते.

ठा म पा ग्राउंड ब्रह्मांड पासून डावी बाजू हिरानंदानी कड्डे – हिरानंदानी सर्कल पासून डावी बाजू – ऋतू टॉवर – कविता पाटील यांच्या बंगल्या पासून आझाद नगर- आझादनगर पासून ढोकाळी कडे – हायलँड वरून कापूर बावडी कडे – माजिवडा – ऋतू पार्क – वृंदावन बस स्टॉप- श्रीरंग सोसायटी पासून केशर मिल कडे- कैशर मिल सर्कल पासून हॉली क्रॉस स्कूल ,कोर्ट नाका पासून दिघे साहेब यांच्या आनंद आश्रम उजव्या बाजूने गडकरी रंगायतन सर्कल- दगडी शाळे पासून डावी बाजूने तीन पेट्रोल पंप – हरी निवास सर्कल पासून डावी बाजू – गजानन वडापाव च्या येथून उजव्या बाजूने – गोखले मंगल हॉल पासून नौपाडा रोड वरून – महात्मा ज्योतिबा फुले मार्ग पासून – सरळ घंटाळी देवी मंदिर येथे समाप्त झाली. या रॅलीत 1500 हुन अधिक बाईकस्वार सहभागी झाले होते. ज्या ज्या भागातून ही रॅली जात होती त्याठिकाणी केळकर यांच्या या रॅलीला दमदार प्रतिसाद मिळत होता. ठाणे शहर जिल्हा युवा मोर्चा चे अध्यक्ष सुरज दळवी यांच्या नेतृत्वाखाली ही महारॅली आयोजित केली होते. युवा मोर्चाच्या सर्व कार्यकार्यें व पदाधिकाऱ्यांनी या महारॅली करिता मेहनत घेतली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech