मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या तिसरा टप्प्यासाठीचा प्रचार रविवारी संध्याकाळी ५ वाजता संपला. महाराष्ट्रातल्या ११ जागांसाठी मंगळवारी म्हणजेच ७ मे च्या दिवशी मतदान होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडाका रविवापर्यंत दिसून आला. अशातच नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ठाकरेंचा विश्वासू नेता शिवसेनेत आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या नेत्याने पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं नाशिकचं टेन्शन वाढल्याची चर्चा आहे.
नाशिकमधले ठाकरे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते विजय करंजकर यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे आणि पहाटे अडीच तीनच्या सुमारास मुंबईतल्या बाळासाहेब भवन या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी दादा भुसेही उपस्थित होते. विजय करंजकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.