सावरकरांचा अवमान करणाऱ्यांना जनता जागा दाखवेल – पंतप्रधान

0

नाशिक – लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होऊ शकते. तसेच अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे वक्तव्य राष्टवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे त्यांना त्यांची जागा या निवडणुकीमध्ये मतदार हे दाखवून देणार आहेत हा संकल्पच मतदारांनी केला आहे.

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भाजपच्या डॉ. भारती पवार आणि हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे सभा झाली या सभेला ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमन झाले त्यावेळी उपस्थित त्यांनी मोदींचा आणि श्रीरामाचा गजर करत स्वागत केले व्यासपीठावरती मोदी यांना नाशिक जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतीक म्हणून टोपी आणि उपर देऊन तसेच शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने घोंगडी आणि काठी देऊन सत्कार करण्यात आला. या सभेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भारती पवार, नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवार हेमंत गोडसे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड राज्यातील उद्योग मंत्री उदय सामंत आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे राहुल ढिकले नाशिक भाजप महानगरप्रमुख प्रशांत जाधव, पवन भगूरकर, यांच्यासह अन्य नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय शिवाजीच्या घोषणा देत भाषणाला सुरुवात केली. सप्तशृंगी मातेला आणि नाशिकच्या प्रभू श्रीराम चंद्राला नमन करतो, असे त्यांनी म्हटले. काल काशीत बाबा विश्वनाथ आणि काल भैरवाचा आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. आज त्र्यंबकेश्वर, नाशिकच्या धर्तीवर आलोय. तुमची सेवा हेच माझ्या आयुष्यातील ध्येय आहे . असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार, असे त्यांनी म्हटले. नाशिकच्या पिंपळगाव येथे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि भारती पवार यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech