उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडलेले…..! शिवसेना सहप्रवक्ते डॉ.राजू वाघमारे यांची टीका

0

 

मुंबई – एखाद्याचे मानसिक संतुलन बिघडले की,’ तो राहील का मी राहीन, ‘अशी भाषा केली जाते.त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांनी केलेले भाष्य हे मानसिक संतुलन बिघडल्याचे लक्षण असल्याची घणाघाती टीका शिवसेना सहप्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली.मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना,मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनांना मिळणारा जबरदस्त प्रतिसाद,राज्यात झालेली ८१ हजार १६७ कोटींची गुंतवणूक यामुळे विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त झाले असल्याचा टोलाही डॉ.वाघमारे यांनी लगावला.

डॉ.वाघमारे म्हणाले की,जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले.ज्यांच्या हाताला कधी माती लागली नाही ते उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय बोलणार? उद्धव ठाकरेंना स्वप्नांतील गोष्टींबाबत बोलण्याची सवय झाली आहे.मुंबई महानगर पालिका कोणी विकू शकेल का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी ठाकरे यांच्या वक्तव्याची यथेच्छ खिल्लीही उडवली. खोटं नरेटिव्ह सेट करण्याचे उध्दव ठाकरेंचे प्रयत्न सुरु असून ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याने त्यांच्याकडून अशी वक्तव्ये येत आहेत, असेही डॉ.वाघमारे निदर्शनास आणून दिले.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती.मात्र या बैठकीला महाविकास आघाडीचा एकही नेता फिरकला नाही आणि तेच नेते बाहेर जाऊन बडबड करत असून आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा घुमजाव केले.त्यांनी त्यांची भूमिका न सांगता थेट केंद्र सरकारवर बोट ठेवले.मात्र जोपर्यंत उध्दव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसची आरक्षणावर भूमिका स्पष्ट करत नाहीत तोवर त्यांना आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही,अशा परखड शब्दात डॉ.वाघमारे यांनी ठणकावले.

ते पुढे म्हणाले की,महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले,अशी ओरड करणाऱ्या विरोधकांच्या कानशिलात लगावण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. महाराष्ट्रात ८१ हजार १६७ कोटींची गुंतवणूक झाली.यातून जवळपास ७५ हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत.

संजय राऊत यांचे डोके ताळ्यावर नसल्याने ते वेड्यासारखी बडबड करत असल्याची टीकाही डॉ.वाघमारे यांनी केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निधड्या छातीचे असल्यानेच गुवाहाटीलां जाताना ते उद्धव ठाकरे यांना फोनवर थेट बोलून गेले.मात्र ठाकरेंसारखा पाठिमागून वार करणारा आमचा नेता नाही,असाही सणसणीत टोलाही डॉ.वाघमारे यांनी लगावला.
………………………..

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech