एअर इंडियाच्या गलथान कारभाराचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना फटका

0

एअर इंडिया ची नगरी उड्डाण मंत्र्यांकडे तक्रार करणार

मुंबई – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले आज सकाळी एअर इंडियाच्या ए आय 866 या विमानाने सकाळी 9 वाजता दिल्लीला रवाना होण्यासाठी ते या विमानात आसनस्थ झाले.दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात महत्वाच्या बैठकीला उपस्थीत राहण्यासाठी ना.रामदास आठवले एअर इंडियाच्या विमानाने रवाना झाले.विमान आकाशात झेपावल्या नंतर उंच आकाशात विमानात तांत्रिक बिघाड झाला. तांत्रीक बिघाड झाल्यामुळे पुन्हा मुंबई विमानतळावर विमानाचे यशस्वी लँडिंग होत ते उतरवण्यात आले .त्यात सर्व प्रवासी सुखरुप आहेत.ना.रामदास आठवले सुध्दा सुखरुप आहेत.मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर सुध्दा विमान दुरुस्ती करण्यासाठी ते विमान मुंबई विमानतळावर चार तासापासुन विमान तळावरच थांबवण्यात आले . सकाळी 9 वाजल्या पासुन दुपारी 1 वाजेपर्यंत विमान हे विमानतळावरच थांबवण्यात आले आहे . त्यामूळे सकाळी 8 वाजता विमानतळावर आलेले केंद्रीय राज्य मंत्री ना.रामदास आठवले आणि अनेक प्रवासी या विमानात दुपारी 1 वाजे पर्यंत विमानतळावर अडकून होतें .त्यामुळे सर्व प्रवासी खोळंबलेले होते. विमानात बिघाड झाला असल्यास एअर इंडियाने ने प्रवाशांना अन्य विमानाने त्यांच्या गांत्व्यास्थळाकडे रवाना करणे आवश्यक आहे. मात्र 6 तासांपेक्षा जास्त वेळ प्रवाशांना ताटकळत विमानात कोंडून ठेवणे चूक आहे . एअर इंडियाचा हा गलथान कारभार पाहून सर्व प्रवासी संतप्त झाले होते. केंद्रीय राज्य मंत्री ना. रामदास आठवले एअर इंडियाच्या या भोंगळ कारभारावर नाराज झाले असून त्यांनी एअर इंडियाची तक्रार नगरी उड्डाण मंत्री के आर नायडू यांच्याकडे करणार असल्याचे सांगत आपला संताप व्यक्त केला.

विमानात तांत्रिक बिघाड झाल्यास विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानाने प्रवासाची मुभा दिली पाहिजे.मात्र एअर इंडियांने तांत्रिक बिघाड झालेल्या विमानातच प्रवाशांना बसवून फार मोठा अन्याय केला आहे.हा एअर इंडियाचा गलथान कारभार अक्षम्य आहे.या ढिसाळ वृत्तीच्या कारभारावर ना.रामदास आठवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय हवाई नागरी उड्डाण मंत्री के आर नायडू यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगीतले. एअर इंडियांच्या ऐ आय866 या विमानत तांत्रिक बिघाड झाल्यानंतर प्रवाशांना उतरवून दुसऱ्या विमानाने त्यांना दिल्लीला रवाना केले पाहिजे. पण मात्र एअर इंडियांने लोकांना त्यांच विमानात पाच तास बसवून त्यांना वेठिस धरले आहे. त्यांना अमुल्य वेळ वाया गेला आहे.या दिरगांईचा सर्व प्रवश्याना फार मोठा फटका बसला आहे. एअर इंडियाच्या दिरंगाईचा फटका ना.रामदास आठवले यांना सुध्दा आज बसला आहे. एअर इंडियांच्या या गलथान कारभारावर ना. रामदास आठवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech