पुणे – शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे घरवापसी करण्याच्या म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. मी भाजपमध्ये परतणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी स्वत: माध्यमांना सांगितले आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामती येथे सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.
मला एकनाथ खडसेंबाबत काहीच माहिती नाही. त्यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून ठीक नाही. आज सकाळीच रोहिनी खडसेंची भेट झाली होती. रोहिनी खडसे आणि मी जवळपास एक तास सोबत होतो. त्यांनी मला खडसेंची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. त्यांच्या कुटुंबाची अडचण सुरु आहे. त्यांच्यावर स्ट्रेस आणि टेंशन आहे. त्यामुळे आम्हालाही एकनाथ खडसे यांची काळजी असते. रोहिनी खडसेंनी भाजप प्रवेशाबाबत काही भाष्य केलं नाही, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. एखाद्या सीटवर वाद होत असतो. आमच्याकडे लोकशाही आहे. आमचे उमेदवार आम्ही ठरवतो. आमचे उमेदवार मोठा पक्ष ठरवत नाही, असा टोलाही सुळे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.