भाजपच्या धर्मवाद, जातीवादाने देशाचे नुकसान – योगेंद्र यादव

0

पुणे – भारत जोडो हा देशातील सार्वजनिक चळवळीचा एक मंच आहे. आमचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, पण सन २०२२ पासून भाजपने देशात जो काही धर्मवाद, जातीवाद चालवला आहे, त्यात देशाचे नुकसान आहे. त्यापासून देशाला वाचवणे कर्तव्य वाटल्याने आम्ही इंडी आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असे भारत जोडो अभियान चळवळीचे केंद्रीय प्रमुख योगेंद्र यादव यांनी पुण्यात सांगितले. काँग्रेस भवनमध्ये यादव यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला.

यावेळी चळवळीच्या राज्य प्रमुख उल्का महाजन, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यघटनेला हात लावला तर कसा झटका बसतो याचा अनुभव लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने भारतीय जनता पक्षाला दिला, त्यामुळेच ते आता विधानसभा निवडणुकीत तो मुद्दा नाहीच असे म्हणत आहेत. मात्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही तोच मुद्दा आहे असा दावा भारत जोडो अभियान चळवळीचे केंद्रीय प्रमुख योगेंद्र यादव यांनी केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही त्यांना याचा फटका बसणार आहे असा दावा त्यांनी केला.

लोकसभेला देशातील १५५ लोकसभा मतदारसंघात, महाराष्ट्रात ३१ लोकसभा मतदारसंघात आम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांना भाजपकडून असलेले धोका समजावून दिला. त्यापैकी देशात ४० तर राज्यात १७ लोकसभा मतदारसंघात इंडी आघाडीला विजय मिळाला. हे आम्ही केले असे आमचे म्हणणे नाही, मात्र या विजयात आमचाही वाटा आहे, असेही यादव म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech