आणखी एक गिरीशिखर ग्रिहिथाच्या चिमुकल्या पावलांशी…

0

प्रजासत्ताक दिनी नवा विक्रम

मुंबई : भारताची सर्वात छोटी गिर्यारोहक आणि महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ग्रिहिथा सचिन विचारेची ओळख आहे. ठाणे, महाराष्ट्रातील या १० वर्षांच्या चिमुरडीने आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारताच्या ७६व्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारीला ग्रिहिथाने उत्तराखंडमधील केदारकंठा या ३८०० मीटर उंचीच्या शिखरावर आपला तिरंगा फडकवला.

ग्रिहिथाचा हा प्रवास २२ जानेवारीला मुंबईतून सुरू झाला. शिखर गाठेपर्यंत तिने -10°C ते -4°C इतक्या हाडं गोठवणाऱ्या तपमानाचा सामना केला. पावलो-पावली नवीन आव्ह असलेल्या भूप्रदेशातून तिचा हा ट्रेक होता… तिचा निग्रह, कौशल्य आणि धाडसापुढे सगळ्या प्रतिकूलतेनेच जणू हात टेकले आणि ग्रिहिथाने हे शिखरही सर केले.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे प्रजासत्ताक दिनी केदारकांठा शिखरावर भारतीय तिरंगा फडकवणारी ग्रिहिथा सर्वात तरुण भारती ग्रिहीथा विचारे यांचा प्रजासत्ताक दिनी नवा विक्रम

भारताची सर्वात छोटी गिर्यारोहक आणि महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे, महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रातील 10 वर्षीय ग्रिहीथा सचिन विचारे ने आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी, 26 जानेवारी 2025 रोजी, ग्रिहीथा ने उत्तराखंडच्या केदारकंठा (3800 मीटर) शिखरावर यशस्वीरित्या भारतीय तिरंगा फडकवला.

ग्रिहीथाचा अतुलनीय प्रवास 22 जानेवारी 2025 रोजी मुंबईतून सुरू झाला. शिखरावर पोहोचण्यासाठी तिने -10°C ते -4°C पर्यंतच्या तापमानाला शौर्य दाखवत आव्हानात्मक भूप्रदेशातून ट्रेक केला. तिने शिखरावर भारतीय ध्वज फडकवल्याने तिचा दृढनिश्चय आणि लवचिकता सार्थ ठरली.

या उल्लेखनीय कामगिरीने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला, भारताच्या प्रजासत्ताक दिनी केदारकांठा शिखरावर चढणारी आणि भारतीय तिरंगा फडकवणारी ग्रिहीथा ही सर्वात तरुण भारतीय ठरली आहे.

ग्रिहिथाच्या आजवरच्या प्रवासाबद्दल – 

फक्त साडे सहा वर्षांची असताना ग्रिहिथाची गिर्यारोहण कारकीर्द सुरू झाली. या क्षेत्राते अनेक मोठे, प्रतिष्ठित पुरस्कार तिला मिळाले आहेत. ९ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि १ एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तिच्या नावावर आहेत.

तिने सह्याद्रीतले अनेक कठीण ट्रेक, किल्ले आणि सुळके सर केले आहेत. फक्त ८ वर्षांची असताना एव्हरेस्ट बेस कॅम्प, नेपाळ, ९ व्या वर्षात माउंट किलिमांजारो-टांझानिया, मलेशियातील माउंट किनाबलू आणि १० वर्षांची असताना माउंट बाजारदुझू, रशिया/अझरबैजान अशी शिखरे तिने सर केली आहेत. असे करणारी ती सर्वात तरुण भारतीय आहे.

ग्रिहिथाची ही भरारी जिद्द आणि गिर्यारोहणाच्या आवडीचाही जणू पुरावाच. चिमुरड्या ग्रिहिथाची यशोगाथा देश-विदेशातील तरुण साहसी मंडळींनाही प्रेरणा देते आहे. उत्कृष्ट भारतीय गिर्यारोहक म्हणून ग्रिहिथाने भारताची मानही नक्कीच उंचावली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech