गौतम गंभीर होणार टीम इंडियाचा हेड कोच?

0

मुंबई – गौतम गंभीर टीम इंडियाच्या खेळाडूंचा प्रशिक्षक होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. गौतम गंभीरकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. त्याशिवाय मेंटॉर म्हणूनही त्याने यशस्वी काम केले. आयपीएल २०२४ च्या विजेत्या कोलकाता संघाचा गौतम गंभीर मेंटॉर होता. आता गंभीर टीम इंडियाचा हेड कोच होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राहुल द्रविडने कार्यकाळ वाढवण्यास नकार दिल्यानंतर बीसीसीआयकडून नव्या कोचचा शोध सुरु झाला होता. त्यासाठी अर्जही मागवण्यात आले होते. त्यावेळी बीसीसीआयने गौतम गंभीर यालाही अर्ज करण्याचा आग्रह केला होता. गौतम गंभीरचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे म्हटले जाते. गौतम गंभीर आणि जय शाह यांच्यात २६ मे रोजी चेन्नईत दीर्घ चर्चा झाल्याचे समजते.

एका आयपीएल संघ मालकाने गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच होणार असल्याची माहिती दिली. त्या संघमालकाच्या मते गौतम गंभीर टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक असेल. बीसीसीआय आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली. त्यामुळे याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते. दरम्यान, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाबाबत बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. तथापि, गौतम गंभीर याचा तगडा अनुभव पाहता गंभीरबाबत शक्यता बळावली आहे.

गौतम गंभीर याच्याकडे आंतरराष्ट्रीय अथवा देशांतर्गत क्रिकेटमध्ये कोचिंगचा कोणताही अनुभव नाही. २०२२-२०२३ आयपीएल हंगामात गौतम गंभीर लखनौ सुपर जायंट्स संघाचा मेंटॉर होता. लखनौची कामगिरी शानदार झाली होती. आयपीएल २०२४ हंगामात तो कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात होता. गौतम गंभीर मेंटॉर असताना लखनौ संघ दोन वर्षे प्लेऑफमध्ये दाखल झाला होता. यंदा कोलकाताने चषकावर नाव कोरले. यंदाच्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहचणारा कोलकाता पहिला संघ ठरला होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech