केंद्र सरकारने ‘बीसीसीआय’ला अधिनस्थ ठेवावे – हेमंत पाटील

0

पुणे : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) केंद्र सरकारने आपल्या अधिनस्थ ठेवावे, अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी गुरूवारी (दि.२६) केली. किक्रेटच्या विविध आयोजनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या मंडळाने केंद्र सरकारच्या देखरेखीखाली काम करणे आवश्यक असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

स्वायत्त आणि खासगी संघटन असल्याने बीसीसीआय भारतीय राष्ट्रीय क्रिडा महासंघाच्या अधिनस्थ येत नाही. केंद्र सरकारच्या कुठल्याही पूर्वपरवानगी शिवाय आंतरराष्ट्रीय आयोजनामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार त्यामुळे बीसीसीआयला नाही. या आयोजनांमध्ये भारताचे नाव न वापरता केवळ बीसीसीआय च्या नावाचा वापर मंडळाने करावा, अशी मागणी पाटील यांनी केली. केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यानंतर बरेच बदल दिसून आले आहेत. पंरतु,बीसीसीआय संदर्भात मोदी सरकारने आता योग्य भूमिका घेण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले.

सोसायटी नोंदणी कायद्यानूसार तामिळनाडूत एक सोसायटी स्वरूपात बीसीसीआयची नोंदणी करण्यात आली होती.नोंदणी करतांना बीसीसीआयकडून भारताचे प्रतिनिधित्व करण्यासंबंधी केंद्राकडून कूठलीही परवानगी मागण्यात आली नव्हती. कुठल्याही परवानगी शिवाय बीसीसीआयने क्रिकेट नियामकाचा एकमेव अधिकार ग्राह्य धरत क्रिकेट आयोजनासह भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सुरूवात केली.अशात इतर खेळांप्रमाणे क्रिकेटला देखील केंद्रीय क्रिडा मंत्रालयाद्वारे नियंत्रित करण्याची आवश्यकतेवर पाटील यांनी भर दिला. केंद्र सरकारने यासंदर्भात योग्य पावले उचलावी, अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल, अशा इशारा यानिमित्ताने पाटील यांनी दिला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech