नवी दिल्ली : भारताचे भालाफेकपटू आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक विजेते डीपी मनू याच्यावर नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीकडून ४ वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. डोपिंग प्रकरणात दोषी आढळल्यामुळे डीपी मनू ही बंदी घातली गेली आहे.अॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट (AIU) ने नुकतीच याची घोषणा केली. एप्रिल, २०२४ मध्ये नाडाने इंडियन ग्रांपी १ मधील मनूच्या नमुण्याची चाचणी केली, जिथे त्याने ८१.९१ मीटरच्या सर्वोत्तम फेकमध्ये भलाफेकसह अव्व्ल स्थान मिळवले होते.नाडाच्या डोपिंग विरोधी नियमांच्या कलम २.१ आणि २.२ अंतर्गत बंदी घातलेल्या पदार्थांसाठी नमुना पॉसिटीव्ह आला, जो प्रतिबंधित पदार्थ किंवा पद्धतीच्या उपास्थिती आणि वापराशी संबंधित आहे. मनूच्या सॅम्पलमध्ये मिथाइलटेस्टोस्टेरोन हे प्रतिबंधित पदार्थ आढळून आल्याने त्याला ३ वर्षाची बंदी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. डोप टेस्ट झाल्यानंतरही मनूने आणखी दोन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, त्याला पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये पंचकुला येथील राष्ट्रीय आंतरराज्य अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपपूर्वी नाडाने तात्पुरते निलंबित केले होते.
नाडाच्या अँटी डोपिंग डिसिप्लिनरी पॅनेलने जारी केलेल्या ताज्या यादीनुसार, डीपी मनूच्या प्रकरणात अंतिम निर्णय 3 मार्च रोजी जाहीर करण्यात आला. त्याच्या चार वर्षांच्या निलंबनाचा कालावधी २४ जून २०२४ पासून बंदी लागू होईन,ज्यामुळे तो २०२८ च्या मध्यापर्यंत खेळाच्या बाहेर राहीन. डोपिंग चाचणीत अपयशी ठरल्यामुळे २५ वर्षीय भालाफेकपटू मनूचे ऑलिंपिकमध्ये जाण्याचे स्वप्न भंगले आहे. मनूची वैयक्तिक सर्वोत्तम फेक ८४.३५ मीटर आहे, जी त्याने जून २०२२ मध्ये चेन्नई येथे गाठली होती. हे अंतर ऑलिंपिकसाठी पात्रता निकषापेक्षा थोडे कमी आहे.मनूने २०२३ मधील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते, तसेच बुडापेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहावे स्थान मिळवले होते. तर एप्रिल २०२४ मध्ये बेंगळुरू येथे आयोजित इंडियन ग्रां प्री-१ मध्ये त्याने ८१.९१ मीटर भालाफेक करत स्पर्धा जिंकली होती. याच स्पर्धेदरम्यान घेतलेल्या नमुन्यांमध्ये डोपिंगची पुष्टी झाली.