सुदर्शन- शुबमन गिलची जोडी ठरली ६ वेळा शतकी भागीदारी करणारी पहिली भारतीय जोडी

0

कोलकाता : गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सोमवारी (दि.२१) खेळवल्या आलेल्या सामन्यात गुजरातच्या सलामवीरांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत इतिहास रचला आहे.शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी पहिल्या विकेटसाठी ७४ चेंडूत ११४ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. या शतकी भागीदारीच्या या दोन्ही फलंदाजांनी आयपीएलमध्ये एक नवा विक्रम रचला आहे.

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या भारतीय जोडीने सहा वेळा शतकी भागीदारी केली आहे. याशिवाय, गिल आणि सुदर्शनच्या जोडीने या हंगामात ८ सामन्यांच्या ८ डावात ५६ च्या सरासरीने ४४८ धावा केल्या आहेत. यात दोन शतकी भागीदारी आणि दोन अर्धशतकी भागीदारींचा समावेश आहे. या हंगामात, शुबमन गिल आणि साई सुदर्शन ही जोडी ४०० पेक्षा जास्त धावा करणारी पहिली जोडी ठरली. विशेष म्हणजे, दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी जोडी म्हणजे सुदर्शन आणि जोस बटलर, ज्यांनी एकत्रितपणे ३५२ धावा केल्या आहेत.

आयपीएलच्या इतिहासात, साई सुदर्शन आणि शुबमन गिल ही जोडी सहा वेळा शतकी भागीदारी करणारी पहिली भारतीय जोडी आहे. पहिल्या क्रमांकावर विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सची जोडी आहे, ज्यांनी हा पराक्रम १० वेळा केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि ख्रिस गेलची जोडी आहे. त्याने ९ वेळा शतकी भागीदारी केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर साई सुदर्शन आणि गिलची जोडी आहे. चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसची जोडी आहे. त्याने हा पराक्रम ६ वेळा केला आहे. शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांनीही ६ वेळा शतकी भागीदारी करण्याचा विक्रम केला आहे. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी ५ वेळा हा पराक्रम केला आहे. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनीही ५ वेळा शतकी भागीदारी केली आहे. तर गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांनीही ५ वेळा शतकी भागीदारी केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech