इराणच्या नौदलाची इस्रायलच्या जहाजावर मोठी कारवाई, 17 भारतीय अडकले

0

इस्रायल – इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धसदृश परिस्थिती आहे. त्यातच इराणने यूएईहून भारतात येणारे एमएससी एरिस हे जहाज ताब्यात घेतले आहे. इराणच्या तसनीम न्यूज एजन्सीने हे वृत्त दिले आहे. इराणच्या नौदलाच्या कमांडोंनी इस्रायलशी संबंध असलेलं भारतात येणारे जहाज ताब्यात घेतले आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने हे कमांडो जहाजावर उतरले. त्यानंतर त्यांनी जहाज ताब्यात घेतलं. जहाज ताब्यात घेतल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या जहाजावर पोर्तुगालचा ध्वज आहे. लंडनस्थित कंपनी झोडियाक मेरिटाइमशी हे जहाज संबंधित आहे. Zodiac Group हा इस्रायली अब्जाधीश Eyal Ofer यांच्या मालकीचा आहे. पण या जहाजात असलेले चालक दल भारतीय असून त्यांची संख्या सुमारे १७ असल्याचे सांगण्यात येत आहे.

इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धसदृश परिस्थिती आहे. त्यातच इराणने यूएईहून भारतात येणारे एमएससी एरिस हे जहाज ताब्यात घेतले आहे. इराणच्या तसनीम न्यूज एजन्सीने हे वृत्त दिले आहे. इराणच्या नौदलाच्या कमांडोंनी इस्रायलशी संबंध असलेलं भारतात येणारे जहाज ताब्यात घेतले आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने हे कमांडो जहाजावर उतरले. त्यानंतर त्यांनी जहाज ताब्यात घेतलं. जहाज ताब्यात घेतल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या जहाजावर पोर्तुगालचा ध्वज आहे. लंडनस्थित कंपनी झोडियाक मेरिटाइमशी हे जहाज संबंधित आहे. Zodiac Group हा इस्रायली अब्जाधीश Eyal Ofer यांच्या मालकीचा आहे. पण या जहाजात असलेले चालक दल भारतीय असून त्यांची संख्या सुमारे १७ असल्याचे सांगण्यात येत आहे.

एक कमांडो इतर कमांडोना कव्हर देत होते. हेलिकॉप्टरचा वापर करत हे कमांडो जहाजावर उतरले. इराणच्या निमलष्करी दल रिव्होल्युशनरी गार्डकडून या हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे, ज्यांनी यापूर्वीही जहाजांवर हल्ले केले आहेत. इराण आणि इस्रायलमध्ये युद्धसदृश परिस्थिती असताना इराणच्या नौदलाने ही कारवाई केली आहे. इराणच्या हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन अमेरिकेने या भागात मोठ्या प्रमाणावर युद्धनौका तैनात केल्या आहेत. अमेरिकेने इस्रायलला मदत केल्यास त्यालाही लक्ष्य केले जाईल, असे इराणने म्हटले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech