निवडणुकीसाठी १९८ लालपरी दोन दिवस बुक

0

अकोला : लोकसभा मतदारसंघासाठी दुस-या टप्प्यात शुक्रवार, २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून, मतदान पथकांना जिल्ह्यातील मतदान केंद्रांपर्यंत २५ एप्रिल रोजी नेऊन सोडणे व २६ एप्रिल २०२४ रोजी निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्यांना परत घेऊन येण्यासाठी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात एकूण २३० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) १९८ बसेसचा समावेश असल्याने दोन दिवस प्रवाशांची अडचण होणार आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात म्हणजे २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. मतदानापूर्वी आवश्यक असलेली सर्वच तयारी अंतिम टप्प्यात असून, इव्हीएमवर मतपत्रिका सिलिंग करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार ५६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. स्ट्राँगरूममध्ये ठेवलेले ईव्हीएम युनिट यादृच्छिकरण पद्धतीने वितरीत करण्यात येणार आहेत.

मतदानापूर्वी प्रशासनाने सर्वच तयारी पूर्ण केली असून, निवडणुकीच्या कामात व्यत्यय येऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी एसटी महामंडळाकडे अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी २००, तर वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघासाठी ११० अशा एकूण ३१० बसेसची मागणी करण्यात आली होती. यापैकी अकोला जिल्ह्यासाठी १९८ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.निवडणूक कामासाठी मतदान पथकातील कर्मचारी व इतरांना साहित्य ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या बससह इतर खासगी बसची व्यवस्था प्रशासनाने केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech