अमरावती – अमरावती लोकसभा मतदारसंघातून काल भाजपातर्फे विद्यमान खासदार नवनीत राणांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचे विवरण दिले. २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी नवनीत राणा यांची जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून एकूण संपत्ती ही ११ कोटी २० लाख ५४ हजार ७०३ रुपये इतकी होती. आता ती १५ कोटी ८९ लाख ७७ हजार ४९१ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या संपत्तीत ४.६९ कोटींची म्हणजे ४१ टक्के वाढ झाली आहे. नवनीत राणा या त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत.
रवी राणा यांच्याकडे जंगम आणि स्थावर मिळून ७ कोटी ४८ लाख ६८ हजार ९८३ रुपये इतकी संपत्ती आहे. २०१९ मध्ये त्यांच्याकडे १ कोटी ५१ लाख ६३ हजार ७२३ रुपये इतकी संपत्ती होती. रवी राणांच्या एकूण संपत्तीत ७९ टक्क्यांची वाढ झाली आहे. नवनीत राणा यांच्याकडे २०.७४ लाख रुपये किमतीची टोयॅटो फॉर्च्युनर आणि ४०.५० लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर कार अशी दोन वाहने आहेत. रवी राणांकडे १४.५३ लाखांची स्कॉर्पिओ क्लासिक आणि ४०.२४ लाखांची एमजी ग्लॅस्टोर कार ही वाहने आहेत. नवनीत राणांकडे ५५.३७ लाख रुपयांचे सोन्या-सोन्या-चांदीचे दागिने आहेत.