राज्यात 5 हजार तृतीयपंथी मतदार

0

मुंबई – राज्यात लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा 5 हजार तृतीयपंथी मतदारांचा महत्त्वाचा वाटा असेल. राज्यात 2019 मध्ये 8 कोटी 86 लाख 76 हजार 946 एकूण मतदार असल्याची नोंद झाली होती. यामध्ये 4 कोटी 64 लाख 25 हजार 348 पुरुष मतदार होते. तर 4 कोटी 22 लाख 79 हजार 192 महिला मतदार आणि 2 हजार 406 तृतीयपंथी मतदार होते. आता 5 एप्रिल 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण 9 कोटी 26 लाख 37 हजार 230 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 4 कोटी 86 लाख 4 हजार 798 पुरुष, 4 कोटी 44 लाख 16 हजार 814 महिला मतदार आणि 5 हजार 618 तृतीयपंथी मतदार आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech