मुंबई – श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिरात अर्पण करण्यात आलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव गुढीपाडव्याच्या दिवशी होणार आहे. ९ एप्रिल रोजी होणाऱ्या या लिलावात गणपतीला अर्पण करण्यात आलेले हार , साखळ्या ,सोन्याची नाणी, वळे, माळा, अशा विविध प्रकारच्या अलंकारांचा समावेश आहे. सकाळी ११ वाजल्यापासून हा लिलाव सुरु होईल. त्याचप्रमाणे श्रीसिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती आणि ‘श्री ‘ ची प्रतिमा असलेली ११ ग्रॅम, २१ ग्रॅम, आणि ५१ ग्रॅम ९९९.९९ शुद्धता असलेली चांदीची नाणीही या शुभ मुहूर्तावर विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यकारी अधिकारी वीणा मोरे पाटील यांनी केले आहे.