ठाणे – राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने दिला जाणाऱ्या उद्यानपंडित पुरस्कारासाठी शहापूर तालुक्यातील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांची निवड करण्यात आली आहे . कोविड मुळे २०२० पासून कृषी विभागाचे पुरस्कार रखडले होते, राज्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध पुरस्काराने सन्मानित केले जाते, अखेर रखडलेल्या पुरस्कारांची घोषणा शासनाच्या वतीने शासननिर्णय काढून करण्यात आली ,२०२१ साल चा उध्यानपंडित पुरस्कार आदर्श शेतकरी तथा ठाणे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे याना जाहीर झाल्याने ठाणे जिल्ह्यासह कोकणातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे .
शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम आशा डोळखांब भागात बबन हरणे यांनी फुलशेती ,वनशेती सह चंदन लागवड कुक्कुटपालन,दुग्धव्यवसाय गांडूळखत निर्मिती, भाजीपाला लागवड,केळी लागवड ,फळबाग लागवड, मल्चिंग वापर ,ठिबक वापर,पशुपालक व शेतकरी मार्गदर्शन मेळावे शासकीय योजनांचा प्रचार प्रसार ,आंबा फळपीक नर्सरी,शेळीपालन सौर वापर पाणीबचत शेती,भात पीकस्पर्धा ,विद्यार्थ्यांना शेती व भाजीपाला फळबाग लागवडीबाबत मार्गदर्शन,गोबरगॅस वापर, फळपीक कलम लागवड प्रशिक्षण,यांत्रिक शेती, सेंद्रिय शेती,उत्पादन व विपणन विषयक जनजागृती, उत्पादित माल स्थानिक बाजारपेठेत विक्री व्यवस्थापन आदि बाबत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पत्रकारिता, कृषी पदविका,कायद्याची पदवी आणि जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय शेतकरी अभ्यासदौऱ्यात नवीन तंत्रज्ञानाबाबत माहिती मिळवून आत्मसात करणारे बबन हरणे या शेतकऱ्याला ठाणे पालघर ,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण विभागाचा उद्यानपंडित पुरस्कार राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने जाहीर झाला आहे ,उध्या दिनांक २९ रोजी कृषी विभागाच्या वतीने राज्यपाल सी पी राधाकृष्णन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे,फलोत्पादन मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. २ लाख रुपये आणि शेतकरी कुटुंबाचा सपत्नीक सत्कार सन्मानपत्र देऊन केला जाणार आहे.