बबनराव घोलप, संजय पवार यांचा शिवसेनेत प्रवेश

0

मुंबई – शिवसेना ठाकरे गटात नाराज असलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आज अखेर शिवसेना शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. दोन महिन्यांपूर्वीच बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला होता. मात्र, ठाकरेंकडून कुठलेही उत्तर न आल्याने त्यांनी आज अखेर शिंदे गटाची वाट निवडली. बबनराव घोलप यांच्यासह माजी आमदार संजय पवार यांनीदेखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

पक्षप्रवेशानंतर बबनराव घोलप म्हणाले की, आज माझा शिवसेनेत प्रवेश होत आहे. मी मागची ५४ वर्षे बाळासाहेब यांचा शिवसैनिक म्हणून काम केले आहे. ठाकरे गटाकडून माझ्यावर अन्याय झाला आहे. मला संपर्कप्रमुख पदावरून काढण्यात आले. तिथे काही तरी काळबेरे झाले, असे म्हणता येईल. त्यामुळे मी उपनेतेपदाचा राजीनामा दिला, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. शिंदे साहेब गोरगरिबांचे काम करतात. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत राहणे गरजेचे आहे. मध्यंतरी मी समाजाचे काही प्रश्न मांडले. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मी २५ वर्षे आमदार राहिलो आहे. माझ्याकडे महाराष्ट्राची माहिती आहे. त्यामुळे मला राज्यातील जी जबाबदारी देतील, ती मी पार पाडेन, असे यावेळी बबनराव घोलप यांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech