सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील समृद्धी वाघिणीचा मृत्यू

0

संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील समृद्धी वाघिणीचा आज पहाटे मृत्यू झाला. ती मागील आठवडाभरापासून आजारी होती. किडनी व्यवस्थित कार्य करत नसल्याने तिने अन्न सोडले होते. ती उपचारासही प्रतिसाद देत नव्हती. चार दिवसांपासून तिला सलाइनद्वारेच पोषक अन्नद्रव्य दिले जात होते, या दरम्यान आज तिने अखेरचा श्वास घेतला.

ती १४ वर्षांची होती. प्राणी संग्रहालयात सुरुवातीला आणण्यात आलेल्या दीप्ती आणि गुड्डू या वाघांच्या जोडीने २०१० मध्ये समृद्धी वाघिणीला जन्म दिला. त्यानंतर समृद्धी वाघिणीने आतापर्यंत तीनदा १० बछड्यांना जन्म दिला आहे. गेल्या आठवडाभरापासून तिचे खाणे कमी झाल्यामुळे ती आजारी पडली. त्यामुळे तिला ४ एप्रिलपासून प्राणी संग्रहालयातील दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले. समृद्धीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असता, त्यात किडनी कार्य चाचणीमध्ये क्रिएटिन आणि ब्लड युरियामध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech