मुंबईकरांसाठी खूष खबर…. भातसा धरण ओव्हर फ्लो…

0

(प्रफुल्ल शेवाळे)

शहापूर –
शहापूर तालुका धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो… आणि याच तालुक्यातील तानसा, वैतरणा, भातसा या धरणानमधून मुंबई ला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.. यंदाच्या पावसाळ्यात मागील 8-10. दिवसात तानसा वैतरणा ही धरणे भरून वाहू लागली आहेत.. आज भातसा धरण सुद्धा ओसंडून वाहू लागले आहे. आज संध्याकाळी 6:30 च्या सुमारास भातसा धरणाचे तीन दरवाजे 0.50 cm ने उघडण्यात आले आहेत.तर रात्री साडे आठ वाजता ८ दरवाजे उघडण्यात आले होते.

आज तारीख:-03/08/2024 (PM 5.15) रोजी भातसा धरण
पाण्याची पातळी – 138.00 मी होती
स्टोरेज क्षमता – 867.508 mm3 (88.87%)

*स्पिलवे डिस्चार्ज* :- धरणाची पातळी 138.00 मीटर राखण्यासाठी 3 गेट्स 50 सेमी, दिनांक 03/08/2024 संध्याकाळी 6.30 वाजता उघडले गेले आहेत. धरणाच्या 3 गेटमधून विसर्ग (1,3,5) मधून पाण्याचा विसर्ग 5145.70 क्युसेक इतका असणार आहे.
धरणक्षेत्रात
1 जूनपासून एकूण पाऊस 1913.21 मिमी इतका पडला आहे. एकंदरीत शहापूर तालुक्यातील तीन धरणे भरल्याने मुंबईकर सुखावले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech